दोन आघाडीच्या अभिनेत्री एकमेकांच्या चांगल्या फ्रेंड्स असू शकत नाही असे म्हटले जाते. पण मराठी चित्रपटसृष्टी या गोष्टीला अपवाद असल्याचे आपण म्हणू शकतो. कारण मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अनेक अभिनेत्री एकमेकांच्या खूप चांगल्या फ्रेंड्स आहेत. त्या अनेकवेळा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. सई ताम्हणकरने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओत सोनाली कुलकर्णीआणि सई ताम्हणकर एकमेकांच्या किती चांगल्या फ्रेंड्स आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Having some fun with my pact buddy @sonalee18588 🐙. #bts #pactbuddy #sonabai #chiutai #forthepact #friendshipgoals

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओत सई चक्क सोनाली कुलकर्णीला उचलताना दिसत आहे. सई आणि सोनालीचा हा धमाल व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून मी माझ्या मैत्रिणीसोबत मस्ती करत आहे असे सईने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे.

सई आणि सोनाली यांनी क्लासमेट, झपाटलेला २, हाय काय नाय काय... यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. आता त्या दोघी प्रेक्षकांना धुराळा या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात त्या दोघींसोबतच अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक, अंकुश चौधरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विध्वंस करणार असून त्यांनीच त्यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरून या चित्रपटाबाबत सगळ्यांना सांगितले होते. या चित्रपटाचे चित्रीकरण काही महिन्यांपूर्वी सुरू झाले असून या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा फोटो समीर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा फोटो लोकांना प्रचंड आवडला होता.  

सई आणि सोनाली चित्रपटात एकत्र काम करत असल्याने हा त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काढलेला व्हिडिओ असू शकतो असा अंदाज लावला जात होता. पण हा फोटो खरंच कधी काढला याविषयी केवळ सोनाली आणि सईच आपल्याला सांगू शकतात. पण या व्हिडिओत या दोघांची खूप चांगली बाँडिंग दिसून येत आहे यात काहीच शंका नाही.