स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा.लि. निर्मित व अष्टविनायक प्रकाशित 'दहा बाय दहा' नाटकाचा नुकताच ठाण्यात राम गणेश गडकरी प्रयोग पार पडला.

सुप्रिया पाठारे

 त्या मध्ये सुप्रिया पाठारेची मैत्रीण सुरभी भावे ठाण्यात राम गणेश गडकरी नाट्यगृहात प्रयोग पाहण्यासाठी गेली होती. नाटक पाहिल्यानंतर तिने या नाटकावर प्रतिक्रिया देणारा एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यात तिने सांगितले की, मी आताच दहा बाय दहा नाटक पाहिले. अतिशय सुंदर, कॉमेडी व उत्तम अभिनय या नाटकात पहायला मिळतो. खूप हसायला मिळाले. सुप्रिया व विजय पाटकर यांनी खूप छान काम केले आहे. मी सुप्रिया ताईसोबत एका मालिकेत काम केले आहे. ताईचे विनोदी ट्युनिंग इथे पहायला मिळाले. खरेतर सुप्रिया ताईच्या एका बोटाला थोडेसे फ्रॅक्चर झाले आहे. ते दुःख लपवून लोकांना हसविण्याचे जे काम केले ते आऊटस्टॅण्डिंग आहे. खूप मजा आली. तुम्हीदेखील हे नाटक पहा.