जितेंद्र जोशी  एक परिपूर्ण  'खलनायक'

 

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे 'जितेंद्र जोशी'. त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. आजवर त्याने अभिनेत्यापासून ते अगदी निवेदकापर्यंत सर्वच भूमिका योग्यरितीने हाताळल्या. एका उत्तम विनोदी कलाकाराचा खलनायकी चेहरा देखील तितकाच प्रशंसनीय आहे.

 

 

लूक्स
लूक्स
 

 

क्लीन शेव आणि लांब केस राखलेला साई असो, दाढी मिशा असणारा सम्राट कोलते पाटील असो किंवा भारदार मिशा असणारा बाजी मधील मार्तंड असो, जितेंद्रने त्याच्या चेहऱ्यावर लूक्स साठी बरेच प्रयोग केले आणि ते त्याला शोभले सुद्धा. श्रेयस तळपदे विरुद्ध त्याने साकारलेला मार्तंड हा देखील तितकाच मनोरंजक ठरला.

 

 

विनोदवृत्ती
विनोदवृत्ती

 

'बाजी' मध्ये त्याने पुन्हा एकदा खलनायकी पात्र रंगवले. जरी त्याचे पात्र नकारात्मक पात्र असले तरी त्यातही एक विनोदी वळण होते आणि असं असलं तरी, जितेंद्र सहजतेने खलनायकी वृत्ती आणि विनोद यांची योग्य सांगड घालतो.

 

 

शारीरिक भाषा
शारीरिक भाषा

 

'दुनियादारी' पूर्वी त्याला बरेचदा विनोदी अभिनेता म्हणूनच पाहिले गेले. खरं तर त्याच्या विनोदी पात्रांची बॉडी लँग्वेज हि त्याच्या दृष्टीने जमेची बाजू आहे, परंतु खलनायकी पात्र करून त्याला उत्तम न्याय देत त्याने त्याच्या चाहत्यांना अचंबित केले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'माउली' मध्ये त्याने केलेला खलनायक लक्षात राहण्यासारखा आहे.

 

 

अभिनय कौशल्य
अभिनय कौशल्य

 

मराठी चित्रपट सृष्टीत बरेच मराठी खलनायक आहेत. परंतु जितेंद्र जोशी यांना उर्वरितांपासून वेगळे ठेवले जाते, कारण आपले अभिनय कौशल्य वापरून नकारात्मक पात्र काढण्याची क्षमता त्याच्यात आहे. 'दुनियादारी' मधला खलनायक साई प्रेक्षकांना भावला. अलीकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट 'प्रेमासाठी कमिंग सून' मध्ये तो पुन्हा त्याच्या वेगळ्या अंदाजात दिसला.

 

 

प्रयोगशील
प्रयोगशील

 

आपल्याला माहीत आहेच की, जितेंद्रने त्याच्या चेहऱ्यावर लूक्स साठी बरेच प्रयोग केले परंतु इतकेच नाही तर  तो आपल्या भूमिका निवडताना सुद्धा भूमिकेबद्दल तितकाच आग्रही असतो. त्याच्या सोबतचे अनेक समकालीन कलाकार जरी एकाच पठडीतील भूमिका करत आहेत, तरी जितेंद्रने विनोदी ते खलनायकी अशा सर्वच भूमिका तितक्याच ताकदीने केल्या आहेत.