अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ असाच आहे.  रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या हॉट फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय.

भाग्यश्री मोटे

भाग्यश्रीच्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. या फोटोत भाग्यश्रीने ब्लॅक रंगाचा टॉप आणि ग्रे कलरचा स्कर्ट परिधान केला आहे.

भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती  'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती. भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता.

भाग्यश्री मोटे

याशिवाय भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे.

भाग्यश्री मोटे

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi