अभिनेत्री नेहा पेंडसेच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसेच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटोंना खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्याचे पाहायला मिळते.

नेहा पेंडसे

नुकतेच तिने काही फोटो इन्स्टावर शेअर केले असून या फोटोत तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या या बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

नेहा पेंडसे

 नेहा आजच नव्हे तर नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजासाठी चर्चेत असते. नेहमीप्रमाणे तिची अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. नेहाने याआधी देखील तिचे अनेक बोल्ड फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले असून तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतात.

नेहा पेंडसे

नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती एका मध्यवर्गीय कुटुंबातील आहे, तिचे वडील हे बिझनेसमन असून आई ही गृहिणी आहे. तिने अभिनयक्षेत्रात करियर करण्यामागे तिच्या आईचा मोठा हात होता. केवळ १० वर्षांची असताना तिने सगळ्यात पहिल्यांदा कॅमेराला फेस केले होते. त्यावेळी तिला त्या कामाचे ५०० रुपये मिळाले होते. हे पैसे तिने तिच्या पालकांना दिले होते. तिने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट, मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

नेहा पेंडसे

नेहाने अनेक मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शोमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करण्याआधी तिने दक्षिण भारतीय चित्रपटांमधून देखील काम केलं होतं. झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी या मालिकेत तिने सहनशील गृहिणीची भूमिका केली होती. तिची ही मालिका चांगलीच गाजली होती.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi