मुंबई: स्पृहा जोशी हल्ली आपल्याला कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवा' ह्या शोमध्ये सूत्रसंचालन करताना दिसत आहे. तिने अगोदर 'किचनची सुपरस्टार' या कार्यक्रमात सुद्धा सूत्रसंचालन म्हणून काम केले होते. 'सूर नवा, ध्यास नवा' या 'रिॲलिटी शो'त पहिल्या सीझनच्या अँकर तेजश्री प्रधानची जागा दुसऱ्या सीझनमध्ये स्पृहाने घेतली आहे. सध्या सर्वीकडे चर्चित असलेल्या ह्या शोला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमात तिचा लहान मुलांबरोबर एक उत्तम कनेक्ट आहे आणि त्याच बरोबर त्यांच्याशी संवाद साधायला तिला खूप आवडतं, स्पृहा ह्या शो मध्ये खूप धमाल, मस्ती, खोडकर आणि हटक्या अंदाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

मराठी  मुलगी स्पृहा जोशी नेहमीच आपल्या सोशल मीडियावर आपल्या मराठी अंदाजातले फोटोज शेअर करत असते, ती आपल्या सोशल मीडियावर नेहमीच अपडेटेड असते. स्पृहाला पारंपरिक पेहराव करायला फार आवडते. ती साडी मध्ये अप्रतिम सुंदर दिसते. तिच्या साडीमधल्या व मराठमोळ्या लुकचे तर सर्वच दिवाने आहेत. तिला मराठमोळा पेहराव अगदीच उठून दिसतो. ती पारंपरिक आणि स्टायलिश या दोन्ही लुकमध्ये हटके दिसते. ती आपले पारंपरिकच नव्हे तर, स्टायलिश फोटोज सुद्धा आपल्या इंस्टाग्राम वर शेअर करत असते. स्पृहा साडीमध्ये नेहमीच खुलून दिसते. ती प्रत्येक मराठी सण आवडीने साजरा करते, प्रत्येक सणांना ती साडी घालते. व प्रत्येक सण ती पारंपरिकरित्या निभावते. 

स्पृहा जोशीस्पृहा जोशीस्पृहा जोशीस्पृहा जोशीSpruhaSpruha Joshi

स्पृहा जोशी नाट्य, दूरचित्रवाणी व चित्रपटसृष्टीवरील अभिनेत्री आहे. हि एक कवयित्रीदेखील आहे. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणारी स्पृहा जोशी मराठी वाहिनीवरील 'उंच माझा झोका' मध्ये रमाबाई रानडे ह्यांची लक्षणीय भूमिका तिने साकारली होती, तसेच अग्निहोत्री, एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये 'कुहू' नावाचे पात्र व एक स्वप्नाळू कवयित्री अशी भूमिका तिने साकारली होती व एका लग्नाची तिसरी गोष्ट इत्यादी मालिकांमध्ये तिने आपल्या कालबाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर तिने मायबाप, मोरया, सूर राहू दे, अ प्लेईंग घोस्ट, बायोस्कोप, पैसा पैसा, लॉस्ट अँड फाऊंड, होम स्वीट होम...अश्या अनेक चित्रपटांतून तिने आपले अभिनय कौशल्य दाखविले आहे.