नाटक, सिनेमा आणि मालिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे रिमाताई. रिमाताई आज आपल्यात नसल्या तरी अभिनयाच्या माध्यमातून त्या कायम अजरामर राहतील. रिमा ताई यांची अखेरची आठवण ठरलेला सिनेमा म्हणजे होम स्वीट होम. रिमाताईंच्या आठवणींना उजाळा देणारा हा सिनेमा २१ जुलैला दुपारी १२ वाजता आणि रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर पहिल्यांदाच पहायला मिळणार आहे.

होम स्वीट होम

घर हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. घर म्हणजे फक्त भिंती नसून त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्या जगण्याशी निगडीत असतात. याच विषयावर हा सिनेमा बेतलेला आहे. अभिनेत्री रिमा यांचा हा शेवटचा चित्रपट असल्यामुळे या सिनेमाला एक वेगळी किनार लाभली आहे. मोहन जोशी, प्रसाद ओक, रिमा, सुमित राघवन, स्पृहा जोशी यांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट एक घरंदाज अनुभव देईल हे नक्की.

तेव्हा पाहायला विसरु नका ‘होम स्वीट होम’ २१ जुलैला दुपारी १२ वाजता आणि रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi