मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सगळ्या सदस्यांना सरप्राईझ मिळाले. महेश मांजरेकरांनी सदस्यांसाठी चॉकलेटस आणली होती... आणि ज्यामुळे सदस्य खूपच खुश झाले... याचबरोबर आठवड्यामध्ये वोटीग लाईन्स बंद होत्या आणि कुणीच घराबाहेर जाणार नाही असे देखील त्यांनी सांगितले, त्यामुळे काल कोणताही सदस्य घराबाहेर पडला नाही... याचसोबत पराग कान्हेरे याने घरामध्ये राहू नये असे मत सगळ्या सदस्यांचे पडले आणि त्यामुळे त्याला घराबाहेर जावे लागले. आज घरामध्ये नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. घरामधील प्रत्येक सदस्याला दोन सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे, जे घरात रहाण्यासाठी अपात्र आहेत. आणि हे कार्य पूर्ण करण्यासाठी बिग बॉस यांनी काही निकष देखील सदस्यांना सांगितले जसे, आतापर्यंतची घरातील तसेच कार्यादरम्यानची निराशाजनक कामगिरी, हा खेळ समजण्याइतपत बौद्धिकचातुर्य नसणे, बिग बॉस यांनी दिलेल्या कार्यात आपली भूमिका नीट न बजावणे, या खेळात डावपेच आखण्याची क्षमता नसणे ... आता बघुया या निकषांवरून कोण कोणाला नॉमिनेट करेल ? तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

bigg

आज घरामध्ये होणाऱ्या कार्यामध्ये नेहा आणि सुरेखाताई मध्ये वाद होणार आहे. या कार्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये माधव आणि वीणा उभे आहेत आणि विरुध्द टीमचे सदस्य त्यांच्यावर पाणी टाकताना दिसत आहेत... ज्यामध्ये सुरेखा ताईनी नेहाला बजावून सांगितले कि, साबणाच पाणी वापर करू नका... ज्यावरून वादाला सुरुवात झाली, नेहाचे म्हणणे होते कि, तुमच्या पिचकाऱ्या नाही चालत, म्हणून आम्हांला जे सुचलं आहे त्याची माती करणार का ? “स्वत: चालवायच होत डोक आहे तर मग” आणि नेहाची ही बडबड ऐकून अभिजीत केळकरने नेहाला सांगितले किती बडबड करतेस बस आता... सुरेखा ताईंनी तिला बजावले कि, मला साबणाच पाणी काढू दे पिचकारी दे मला...पण, नेहाच त्यावर म्हणण होत साबणाच पाणी नाहीये त्यामध्ये...नेहा पुढे म्हणाली “खेळा त्यांच्या बाजूने” त्यावर सुरेखा ताईचा आवाज चढला त्या म्हणाल्या “मी त्यांच्या बाजूने नाही खेळत आहे” आता बघूया कोण हा टास्क जिंकणार ?  आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा.

cc

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi