मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल हीना पांचाळ घराबाहेर पडली... आजपासून नवा आठवडा सुरू होणार आहे. हा नवा आठवडा सदस्यांसाठी कसं असेल ? काय काय टास्क रंगतील ? हे बघणे रंजक असणार आहे... बिग बॉस नेहेमीच सदस्यांवर वेगवेगळे टास्क सोपवत असतात. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ‘बिचुकले की अदालत’ हे कार्य रंगणार आहे. बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले वकिलची भूमिका निभावणार आहेत. या कार्यात बिचुकले  प्रत्येक सदस्यावर काही आरोप लावतील. अभिजीत बिचुकळे यांनी सदस्यांवर लावलेले आरोप त्यांना फेटाळून लावून त्यांची बाजू मांडायची आहे.

qdqwd

टास्कमध्ये वाद – विवाद तर होणारच... बिचुकले सदस्यांवर कोण कोणते आरोप लावतील ? सदस्य स्वत:ची बाजू काशी मांडतील ? हे बघणे रंजक असणार आहे... तेंव्हा नक्की बघा बिचुकले की अदालत आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi