झी मराठीवरील सुप्रसिद्ध 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम म्हणजेच हास्याचा कल्लोळ, हा शो पोट धरून खळखळून हसवणारे विनोदाचा तर भंडारच आहे जणू... मराठीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' बहुचर्चित आहे, अगदीच सर्वांच्याच पसंतीचा झाला आहे, ह्या शो ने अवघ्या महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण जगाला वेड लावले आहे, त्यामधील प्रत्येक कलाकाराचा एक वेगळाच थाट आहे, ह्या तुफान विनोदी मालिकेत प्रमुख भूमिकेत भालचंद्र कदम (भाऊ), निलेश साबळे, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे आहेत. प्रत्येक जण आपल्या विनोदी कलाकौशल्याने सर्वांचीच मन जिंकत आहेत.

मराठी चित्रपट 'वेलकम होम' चे कलाकार स्पृहा जोशी, मृणाल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, आणि उत्तरा बावकर संपूर्ण टीम आपल्या आगामी चित्रपटाचे प्रोमोशन करण्यासाठी ह्या शो मध्ये येणार आहेत. अभिनेत्री स्पृहा जोशी नेहमीच सोशल मीडियावर अपडेटेड असते, तिने आपले 'चला हवा येऊ द्या' ह्या कार्क्रमातले फोटोस आपल्या इंस्टग्राम वर शेअर केले आहेत. 

मराठी चित्रपटसृष्टीत सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या लेखक दिग्दर्शकद्वयीचं स्थान फारच महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी नेहमीच आशयसंपन्न, विचारप्रवर्तक विषय चित्रपटांतून मांडले, त्यांच्या चित्रपटांचा अनेक मानाच्या महोत्सवांमध्ये गौरव करण्यात आला आहे. असाच एक महत्त्वाचा विषय त्यांच्या "वेलकम होम" या चित्रपटातही मांडण्यात आला आहे. हा चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होत आहे

स्पृहा जोशीने शेअर केलेली पोस्ट येथे पहा: 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi