चला हवा येऊ द्या हा मराठी टीव्ही इंडस्ट्री तील एक असा शो आहे जो घरघरात बघितला जातो लहानांपासून ते मोठयांपर्यत सगळे या शो चा आनंद घेतात हा शो इतका लोकप्रिय ठरवण्याचे कारण या शो मध्ये असणारा निखळ हास्य विनोद या शोचे आता पर्यंत ३ भाग आले आहेत त्यात महाराष्ट्र दौरा ते विश्व दौरा पर्यंत जाऊन हा कॉमेडी रिअलिटी शो जगभरातील चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.

आता हा ब्रँड चे निर्माते  नवीन हंगामासह सर्व चाहत्यांना पुन्हा एकदा हसवण्यासाठी सज्ज आहेत . होउ दे व्हायरलच्या ग्रँड फाइनलमध्ये घोषित करण्यात आले होते की, चाला हवा येऊ द्या आगामी हंगामात मराठी इंडस्ट्री तील मोठे टीव्ही कलाकार आपल्याला हसवायला सज्ज होणार आहेत.

नुकत्याच संपलेल्या हंगामात सर्वसामान्य लोकांना त्यांच्या प्रतिभा दर्शविण्यास एक मंच चला हवा येऊ द्या करून देण्यात आला होता. आगामी हंगामात मराठी टीव्ही इंडस्ट्री तील काही लोकप्रिय चेहरे आपल्याला प्रेक्षकांना हसवताना दिसतील. नवीनतम अहवालानुसार, गर्गी फुले आणि मोहिनीराज घाटणे, आशुतोष गोखले उर्फ जयदीप सरंजामे आणि प्रतिष्ठा देशपांडे उर्फ तुला पाहते रे मधला बिपिन  आणि रात्रीस खेळ चाले मधला प्रल्हाद कुरतडकर (पांडु)  यांसारखे मराठी कलाकार चाला हवा येऊ द्या आगामी हंगामात भाग घेणार आहे.

हे सगळे मराठी कलाकार आपल्या लाडक्या जनतेला हसण्याचा आनंद देण्यासाठी आपला कॉमिक टाईमिंग दाखवण्यासाठी फार उत्साही आहेत.चाहत्यांना कलाकारांमधील गंभीर स्पर्धा अपेक्षित आहे प्रत्येक कलाकार चला हवा येऊ द्या चे विजेते हे पद जिंकण्यासाठी फार उत्सुक आहेत

आगामी हंगामाचे शीर्षक आणि प्रक्षेपण तारीख आणि प्रसारण कालावधीचे पुढील तपशील अद्याप जाहीर केला गेलेला नाहीये.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi