प्रसिद्ध अभिनेता जॉनी लीव्हरसह 'एक टाप्पा आउट' आगामी कॉमेडी रियलिटी शोचे दोन अजून परीक्षक असतील आणि ते म्हणजे मराठी कॉमेडी चा किंग भरत जाधव आणि हास्याची फुलराणी निर्मिती सावंत. जॉनी लिव्हर सोबत तेही मुख्य परीक्षणाचे काम पार पडतील.

याशिवाय, या शोमध्ये स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी चार मार्गदर्शक असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकप्रिय कॉमेडियन हेमांगी कवी, अभिजित चव्हाण, आरती सोलंकी आणि विजय पटवर्धन यांना ह्या शो मध्ये हे स्थान प्राप्त झाले आहे.

या शोने जॉनी लीव्हर मराठी टीव्ही इंडस्ट्रीत आपली सुरुवात करेल. याशिवाय, अभिनेता भरत जाधव मोठ्या विलंबानंतर छोट्या पडद्यावर परत येत आहेत. भरत जाधव  यांनी हसा चकटफू आणि साहेब बिवी आणि मी सारख्या टीव्ही शोमध्ये प्रमुख भूमिका बजावली, तर येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत नुकत्याच जाऊबाई जोरात शोमध्ये प्रमुख भूमिका बजावत होत्या. त्यांना सिटकॉम च्या गंगुबाई नॉन-मॅट्रिक या शो मुळे प्रसिद्धी मिळाली आणि 1760 ससुबाई, तू तु मे मे इत्यादी कार्यक्रमांचा त्या एक अविभाज्य भाग होत्या.

आता 'एक ताप्पा आउट' हा सर्व प्रतिष्ठित कॉमेडीयन्स  ना मराठी प्रेक्षकांच्या जवळ आणेल. शोची प्रक्षेपण तारीख अजून निश्चित केली गेली नसली तरी, शोचे ऑडिशन लवकरच महाराष्ट्रच्या विविध जिल्ह्यांत सुरू होण्याची अपेक्षा आहे.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi