मुंबई  : बिग बॉस मराठी सिझन 2 चा या आठवड्यातील WEEKEND चा डाव मध्ये महेश मांजरेकरांनी अभिजीत बिचुकलेंची, शिव - वीणाची शाळा घेतली. अभिजीत बिचुकले नेहेमीच चर्चेत असतात... मांजरेकर यांनी बिचुकलेंना घरात इतर सदस्यांची लायकी का काढता असा जाब विचारला. तर घरातील सदस्यांनादेखील बिचुकले यांची त्यांच्यासोबत राहण्याची लायकी आहे का ?' असा प्रश्न विचारल तेंव्हा त्यावर बहुतेक सदस्यांनी बिचुकले यांची त्यांच्यासोबत राहण्याची लायकी नाही असं उत्तर दिले. वूट आरोपी कोण यामध्ये रोहिणी यांनी शिवला आरोपी ठरवले. त्यांनी बिग बॉसची आणि आरोहीची माफी मागायला सांगितली, तर शिवला वीणा सोबत नव्हे तर आरोहसोबत डान्स सादर करावा अशी शिक्षा दिली. या आठवड्यात हीना आणि शिव हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले होते आणि कमी मत पडल्यामुळे हीनाला  घराबाहेर जावे लागले. वीणा खूप भाऊक झाली. येत्या आठवड्यात सदस्यांना कोणते नवे टास्क मिळणार ? कसा असणार त्यांचा हा येणारा नवा आठवडा ?  हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.     

dswd

घरामधून हीना बाहेर पडल्यावर अभिजीत बिचुकले यांनी गाणे सादर केले... हीनाला तिच्या आतापर्यंत घरातील प्रवासाची AV दाखविण्यात आली.

सुप्रसिध्द राशीतज्ञ शरद उपाध्ये मंचावर आले आणि त्यांनी प्रत्येक सदस्यांना त्यांच्या राशीबद्दल सांगितले... त्यांनी प्रत्येक सदस्याची रास देखील संगितली आणि त्यांचे भविष्य... तर बिचुकलेंची रास कुठली आहे ? या प्रश्न मला देखिल ८४ दिवस पडला असे ते मजेत म्हंटले. वीणा आणि आरोह वृषभ राशीची असून त्यांनी शिवची वृश्चिक रास आहे आणि त्याचे वीणाशी कसे पटले हा प्रश्न आहे असे ते म्हणाले... शिवानी आणि नेहा या मकर राशीच्या आहेत... मकरही कष्टाळू रास आहे, बराच विलंब, अडथळे असतात आणि दिसतात तितके रागीट नसतात असे सांगितले. तर त्यांनी प्रत्येक राशीला अनुसरून मजेदार उदाहरण देखील दिली.

महेश मांजरेकरांनी सदस्यांना सल्ला दिला की कधी कधी डेंजर झोनमध्ये येण चांगल असत. प्रेक्षक काय विचार आहेत त्याचा अंदाज येतो. तर रागावर ताबा ठेवा असा देखील सल्ला दिला... घरातील किशोरी शहाणे सोडल्या तर सगळ्यांना रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे असे सांगितले, त्यातल्या त्यात शिवानीने आता त्यावर नियंत्रण ठेवले आहे. घरामध्ये एक खेळ खेळण्यात आला ज्यामध्ये सदस्यांना गाण ओळखून डान्स सादर करायचा होता. वीणा आणि बिचुकले यांनी तू चिझ बडी है मस्त या गाण्यावर तर किशोरी शहाणे आणि अभिजित बिचुकले यांनी साकी साकी रे या गाण्यावर डान्स केला. तर वूट चुगली बूथमध्ये किशोरी शहाणे यांच्या चाहत्याने आरोहविषयी चुगली केली की नेहा आणि शिवानील सांगत होता की, कॅप्टन होण्यासाठी त्या योग्य नाहीत त्यावर आरोह आणि किशोरी यांनी स्पष्टीकरण दिले.

बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? कोण घराबाहेर जाईल ? हे जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन 2 सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi