१५ ऑगस्ट अर्थातच स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष सगळीकडेच पाहायला मिळतो. ठिकठिकाणी परेड, ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेमध्येही स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. शांतीनगर वस्तीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन ध्वजारोहण केलं. या खास दिवशी भारत स्वच्छ अभियानात सामील होण्याचा सर्वांनीच संकल्प केला. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वत:पासून करायची हा ठाम निश्चय सर्वांनीच केला होता. स्वच्छतेचं महत्त्व पटल्यानंतर शांतीनगर वस्तीपासून स्वच्छ अभियानाची सुरुवात झाली. अनिताची भूमिका साकारणाऱ्या सारिका निलाटकर, अंबिकाची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठारे आणि दुर्गाबाईंची भूमिका साकारणाऱ्या दुर्गाबाईंनी हातात झाडू घेत स्वच्छतेच्या दृष्टीने पहिलं पाऊल उचललं. या तिघींचा आदर्श घेत प्रत्येकानेच आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला.

‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या निमित्ताने सामाजिक संदेश देण्याचा मोलकरीण बाई मालिकेच्या संपूर्ण टीमचा प्रयत्न आहे. हा विशेष भाग १५ ऑगस्टला रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका ‘मोलकरीण बाई’ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi