हे घर तुम्हाला ही बोलवतंय का? असा एक मोठा गूढ प्रश्न विचारत झी युवा वर प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक नवी रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि या मालिकेचं नाव आहे 'एक घर मंतरलेलं'.

video link : https://www.instagram.com/p/BuQWlbKlSnB/?utm_source=ig_web_copy_link

झी युवा वर लवकरच एक नवीन रहस्यमयी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे 'एक मंतरलेले घर' मालिकेच्या शीर्षका वरूनच समजून येत आहे हि मालिका प्रेक्षकांना चांगलीच घाबरवणार आहे.या मालिकेत सुरुची आडारकर असणार आहे तिनेच आपल्याच इंस्टाग्राम अकाउंट वर एक प्रोमो शेअर केला आहे त्यातून ह्या वाड्यात किती वेगवेगळे गूढ असणार ही बघायला मिळत आहे घराची ओढ प्रत्येकालाच असते पण एक असेही घर असत जे तुम्हला ओढून घेत.काहीतरी अनपेक्षित असंभवनीय गूढ आणि रहस्यमय या घरत प्रेक्षकांचा गृहप्रवेश ४ मार्च ला होणार आहे आजवर नेहमीच युवांवर केंद्रित मालिका बनवण्यासाठी प्रसिद्ध आसलेली वाहिनी झी युवा आता या मालिकेतून काय नवीन घेऊन येते हे पाहणे औसुक्यचे ठरेल.

झी युवा

आता या मालिकेचे कथानक काय असणार ते कसे पुढे जाणार आणि आज झी युवा ने एक नवीन  फोटो आपल्या इंस्टाग्राम वर शेअर केला आहे त्यात  शनिवार  वाड्याचा उल्लेख होत आहे तर ह्या मालिकेत शनिवार वाडा हि कोणती भूमिका बजावणार का ? हे हि पाहणे फार औत्सुक्याचे ठरेल.

 पाहायला विसरू नका हि नवीन मालिका "एक घर मंतरलेलं" ४ मार्चपासून, सोम - शनि रात्री ९:३० वा झी युवा वर

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi