संभाजी ह्या मालिकेतील, अभिनेत्री पल्लवी वैद्य हिनं पुतळाबाईंच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. पण हिच पल्लवी आता प्रेक्षकांना वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. पल्लवी आता कॉमेडी करणार आहे.

पल्लवी वैद्य

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  लवकरच चला हवा येऊ द्या च्या मंचावर झी मराठीवरील लाडके कलाकार कॉमेडी करणार आहेत. पुतळाबाईसारखी ऐतिहासिक भूमिका साकारलेली पल्लवी आता थुकरटवाडीत येऊन कॉमेडी करून प्रेक्षकांना किती मनोरंजित करेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi