माझ्या नवऱ्याची बायको फेम "सौमित्र" आपल्याला नेहमीच सत्याच्या बाजूने उभा राहणाऱ्या मित्राच्या व्यक्तिरेखेत दिसला.  सौमित्र ने, सत्यासाठी खोट्या मैत्रीची ही साथ सोडून देणे चुकीचे नसेल हा संदेश त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांपर्यंत पोहचवले.  सगळ्यांचा मित्र, ज्याच्या येण्यामुळे वातावरणात चैतन्य येतं, मित्रांच्या जीवाला जीव लावणार, मजा मस्करी करणारा आणि वेळ प्रसंगी समोरच्याला धडा शिकवणारा माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमधील सौमित्र म्हणजे अभिनेता अद्वैत दादरकर याला प्रेक्षक आता वेगळ्या रूपात पाहू शकणार आहेत. अद्वैत सौमित्रच्या व्यक्तिरेखेमुळे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. अद्वैतच मराठी नाट्यक्षेत्रात देखील खूप योगदान आहे. आता प्रेक्षक अद्वैतला टेलिव्हिजनवर कॉमेडी करताना पाहू शकतील.

अद्वैत दादरकर

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  लवकरच चला हवा येऊ दे च्या मंचावर झी मराठीवरील लाडके कलाकार कॉमेडी करणार आहेत.

आता थुकरटवाडीत येऊन कॉमेडी करून सौमित्र म्हणजेच अद्वैत प्रेक्षकांना किती मनोरंजन करेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे आणि लवकरच प्रेक्षकांना या पर्वात अद्वैतला पाहता येईल. त्याच्या कॉमेडीची झलक प्रेक्षकांनी मागच्या भागात पाहिली. त्याचा कॉमेडी कारण्याबद्दलचा अनुभव शेअर करताना सौमित्र म्हणाला, "एक स्किट परफॉर्म करण्यासाठी आम्ही खूप रिहर्सल केली. आता चला हवा येऊ द्या च्या मंचावर कॉमेडी करायची आहे त्यासाठी आम्ही पूर्ण तयारीनिशी मंचावर सज्ज होऊ. या सीझनसाठी मी खूप उत्सुक आहे."

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi