झी मराठी हे मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील एक अग्रगण्य आणि सर्वात लोकप्रिय मराठी चॅनेल आहे झी मराठीवर प्रकाशित होणारी प्रत्येक मालिका तिचा विषय हा वैविध्य पूर्ण असतो यात काही वादच नाही आणि त्याच मुळे हि वाहिनी इतके वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. माहाराष्ट्रातील  जवळ जवळ ७०% जनता या वाहिनी वरील विविध मालिका पाहत असते आणि त्या मुळेच या चॅनल वरील टॉप ५ लोकप्रिय मालिका कोणत्या आहेत हे जाणून घ्यायला लोकांना फारच आवडेल त्यामुळे आपण या मालिका नक्की आहेत तरी कोणत्या हे जाणून घेऊ.
 

1) तुला पाहते रे

 

तुला पाहते रे

 

झी मराठी वर सध्या सुरु असलेली मालिका तूला पाहते रे हि खूप कमी कालावधीतच फार लोकप्रिय झाली. आणि या सफलतेचे कारण वय विसरायला लावणारी हि एक अनोखी प्रेम कहाणी. बऱ्याच दिवसानंतर सुबोध भावे यांचे छोट्या पडद्यावरील पुनरागमन फार जोरदार झाले तसेच नवोदित अभिनेत्री गायत्री दातार हिच्या अभिनययाला लोकांची दाद मिळाली व खूप कमी कालावधीतच या मालिकेने टीआरपी रेटिंग वर नंबर एक चा टप्पा गाठला. वय विसरायला लावत ते खरं प्रेम अस म्हणत विक्रम सरंजामे व इशा निमकर या पात्रांची हि अनोखी प्रेम कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. विक्रम सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन आलिशान गाड्या घर पैसा तर दुसरीकडे चाळीत राहणारी मध्यमवर्गीय इशा या दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या तसेच वयात खूप अंतर असलेल्या ह्या व्यक्ती कश्या एकमेकांना भेटतात मित्र बनतात त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे घडते व त्यानंतर आपले प्रेम जगासमोर सिद्ध करण्यासाठी त्यांना किती प्रयत्न करावे लागतात .हि कथा लोकांच्या मनात भिडली व लोकांचे प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला हीच या मालिकेची खरी सफलता मानता येईल. सोमवार ते शनिवार रात्री ८:३० ते ९:०० वाजे पर्यंत हि मालिका प्रसारित होते.
 

 

२)  तुझ्यात जीव रंगला

 

तुझ्यात जीव रंगला

 

हि मालिका अंजली आणि राणा या दोन मुख्य पत्रांवरच फिरते अंजली एक उच्चशिक्षित शिक्षिका जी गावात येते आणि ती राणा च्या प्रेमात पडते राणा एक शेतकरी ज्याच पाहिलं प्रेम म्हणजे फक्त कुस्ती त्यात राणा ना शिकलेला ना लिहिता वाचता येणारा अंजली त्याला आपले शालेय शिक्षण पूर्ण करण्याची व एक चांगला माणूस बनायची संधी देते व ते दोघे मिळून कोणकोणत्या संकटाना तोंड देतात तसेच घरातील नंदिताच्या कारस्थानांना हि कसे उधळवात ह्या वरच ह्या मालिकेची कथा फिरते. हार्दिक जोशी (राणा दा), अक्षया देवधर (अंजली) आणि धनश्री कडगांवकर (नंदीता) हे या मालिकेतील प्रमुख कलाकार आहेत
.

३) माझ्या नवऱ्याची बायको

 

माझ्या नवऱ्याची बायको

 

ह्या कथेची मुख्य पात्र म्हणजे गुरुनाथ राधिका आणि शनाया. गुरुनाथ हा राधिका सोबत लग्न करून खूप आनंदात जीवन जगत असतो त्यांना एक मुलगा देखील असतो. पण त्या नंतर गुरुनाथ च्या आयुष्यात एन्ट्री होते ती शनाया ची. त्याच्या ह्या ऑफिस मधील सहकाराणीच्या गुरुनाथ प्रेमात पडतो व या मुळे गुरुनाथ च्या आनंदी लग्नाच्या आयुष्यात एक वेगळा ट्विस्ट येतो राधिका गुरुनाथ ला त्याची चूक जाणीव करून द्यायचा प्रयत्न करते पण नंतर राधिका कशी बदलते व आपले अस्तित्व सर्वाना जाणवून देते. यावरच या मालिकेचे कथानक आवलंबून आहे.हा वेगळा विषय प्रचंड लोकप्रिय झाला आहे.हा कार्यक्रम सोमवारी ते शनिवार रात्री 8.00 वाजता झी मराठीवर प्रसारित केला जात आहे. ह्याचा नवीनतम भाग पाहण्यासाठी कृपया ZEE5.com ला भेट द्या


४)  लगीर झालं जी

 

लगीर झालं जी

 

ही मालिका फौजी अजय (अजय ) आणि शीतल (शीतली) च्या आसपास फिरते. प्रेमात पडलेल्या अजय  आणि शीतलीची कथा आहे. अजय चे एक स्वप्न असते ते म्हणजे सेना अधिकारी बनण्याचे आणि शीतल यात त्याला पुरेपूर मदत करते. एका गावातील वातावरणात राहत असल्यामुळे त्याचा स्वप्नांचे पंख कापण्याचे काम तेथील काही मंडळी करत असतात या सगळ्यांना पाठी टाकत ते कसे पुढे जातात त्याचीच हि कथा आहे. लगीर झालं जी या मालीकेत नीतीश चव्हाण (अजय), शिवानी बाकर (शीतली) यांची भूमिका करत आहे.झी मराठीवर सोमवार ते शनिवार 7.00 वाजता या शोचे प्रसारण केले जात आहे. लगिर झालं जी नवीनतम भाग पाहण्यासाठी कृपया ZEE5.com ला भेट द्या.


५) स्वराज्यरक्षक संभाजी

 

स्वराज्यरक्षक संभाजी

 

स्वराज्यक्षक संभाजी हि मालिका छत्रपती संभाजी महाराजांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका करण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतला. संभाजी महाराजांचा जीवन प्रवास कसा होता हे जगासमोर यावे हा या मागचा हेतू होता असे अमोल कोल्हे यांचे म्हणणे आहे शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी जे एक मोठे मराठा राजे बनले. पण त्यांचा खऱ्या जीवनाबद्दल लोकांना खूप कमी माहित आहे त्यांचा खरा जीवन प्रवास लोकांना कळावा यासाठी हि मालिका बनवण्यात आली आहे. ही कथा एका शूर योद्धाची आहे ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य स्वाज्यासाठी देऊ केले .हा कार्यक्रम सोमवारी ते शुक्रवार रात्री 9 .00 वाजता झी मराठीवर प्रसारित केला जात आहे. स्वराज्यक्षक संभाजीच्या नवीनतम भाग पाहण्यासाठी कृपया ZEE5.com ला भेट द्या.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi