झी मराठी वर सध्या सुरु असलेली मालिका तूला पाहते रे हि खूप कमी कालावधीतच फार लोकप्रिय झाली. आणि या सफलतेचे कारण वय विसरायला लावणारी  हि एक प्रेम कहाणी.

बऱ्याच दिवसानंतर सुबोध भावे यांचे छोट्या पडद्यावरील पुनरागमन फार जोरदार झाले तसेच नवोदित अभिनेत्री गायत्री दातार हिच्या अभिनययाला लोकांची दाद मिळाली व खूप कमी कालावधीतच या मालिकेने टीआरपी रेटिंग वर नंबर एक चा टप्पा गाठला.

वय विसरायला लावत ते खरं प्रेम अस म्हणत विक्रम सरंजामे व इशा निमकर या पात्रांची हि अनोखी प्रेम कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. विक्रम सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन आलिशान गाड्या घर पैसा तर दुसरीकडे चाळीत राहणारी मध्यमवर्गीय इशा या दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या तसेच वयात खूप अंतर असलेल्या ह्या व्यक्ती कश्या एकमेकांना भेटतात

मित्र बनतात त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे घडते व त्यानंतर आपले प्रेम जगासमोर सिद्ध करण्यासाठी  त्यांना किती प्रयत्न करावे लागतात .हि कथा लोकांच्या मनात भिडली व लोकांचे प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला हीच या मालिकेची खरी सफलता मानता येईल.

दोघांच्या वयातील अंतर तसेच दोघांच्या असलेल्या वेगवेगळ्या आर्थिक बाजू पण तरीही त्यांच्यात फुलात जाणारे खरे प्रेम हे ह्या मालिकेच्या सफलतेचे रहस्य मानावे लागेल आता पुढे पुढे हि मालिका कशी रंगत जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi