मराठी आणि हिंदीत विनोदाचा बादशहा आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून नावाजले जाणारे, विजय पाटकर तब्बल २० वर्षांनंतर मराठी रंगभूमीवर परतणार आहेत.

अनेक सुप्रसिद्ध हिंदी मराठी मालिका आणि चित्रपटांतील विनोदी भूमिकांमध्ये काम केल्या नंतर  आपल्याला 'दहा बाय दहा' या विनोदी नाटकामधून मनोरंजन करताना दिसून येणार आहेत. येत्या  ६ एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 'दहा बाय दहा'च्या शुभारंभाचा होणार आहे.  अनिकेत पाटील दिग्दर्शित 'दहा बाय दहा' या धम्माल विनोदी नाटकात त्यांच्याबरोबर प्रथमेश परब, सुप्रिया पाठारे हे कलाकारदेखील दिसणार आहेत. तसेच विदिशा म्हसकर हा नवा चेहरादेखील आपल्याला दिसून येईल.

दहा बाय दहा

स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा.लि. निर्मित व अष्टविनायक प्रकाशित 'दहा बाय दहा' नाटकाचा दौरा संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. या नाटकाचे लेखन संजय जामखंडी आणि वैभव सानप यांनी केले आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट घेऊन येत असलेले हे नाटक, सामान्य माणसांना विचार करण्यास प्रेरित करेल.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi