कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

चला हवा येऊ द्या

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या आयपीएल सुरु असल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये क्रिकेटची हवा आहे. पण अशा वेळी चला हवा येऊ द्या त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी 'चला हवा येऊ द्या'च विशेष सिलेब्रिटी पर्व भेटीस घेऊन येणार आहे.

चला हवा येऊ द्या

या विशेष पर्वात विनोदाचे चौकार, षट्कार आणि विनोदाची आतिषबाजी असणार आहे. या पर्वात झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचे लाडके एकूण १६ सिलेब्रिटी सहभागी होणार आहेत. येत्या आठवड्यात प्रेक्षकांना छाया व रघु आणि अवध्या व निमकर म्हणजेच अभिनेता मोहिनीराज गटणे, प्रवीण डाळिंबकर, अवधूत जोशी आणि मिताली साळगावकर हे कलाकार प्रेक्षकांना बसवणार आहेत.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi