पुजा सोशल  मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी पूजाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. त्यात ती ट्रेडिशनल अंदाजात दिसत होती. त्यानंतर आता पूजाने पिंक शेडमधील फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.

पूजा सावंत

पूजाने पिंक रंगाच्या आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि म्हटले की, ती स्वतःच्या परीकथेत मुख्य भूमिका करते आहे. बबिता मालकनीचे आऊटफिट असून फोटो श्रुती बागवे हिने काढला आहे.

काही दिवसांपूर्वीच पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत आहे. तिच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. इतकेच नाही तर तिच्या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतूक झाले होते.

अभिनेत्री पूजा सावंत

पूजा सावंतने क्षणभर विश्रांती या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.   आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi