अभिनेत्री श्रृती मराठे आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिका असो वा सिनेमा दोनही माध्यमात श्रृतीने आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रृती नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

श्रृती मराठे

श्रृतीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक कॅनडिड फोटो शेअर केला आहे. या फोटोत श्रृती दिलखुलास हसताना दिसतेय. श्रृतीचा हा फोटो तिच्या फॅन्सना चांगलाच भावला आहे. श्रृतीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे. या फोटोला आतापर्यंत 53 हजार पेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. श्रृतीच्या हास्याने तिच्या सौंदर्याला चार चांद लावले आहेत.

श्रृती

मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रृतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi