'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. या मालिकेतील गायत्री दातार, शिल्पा तुळसकर आणि सुबोध भावे यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत विक्रांतच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच राजनंदिनीची एंट्री झाल्यापासून आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. ही मालिका जुलै महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेचा शेवट काय होणार याविषयी प्रेक्षकांकडून तर्क वितर्क लावले जात आहेत.

गायत्री दातार

तुला पाहते रे ही गायत्री दातारची पहिली मालिका असली तरी तिला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. पुण्याच्या गायत्रीने या मालिकेतून प्रमुख भूमिका सादर करत टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. पदार्पणातच तिला सुबोध भावे सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं तिने सोनं केलं.

गायत्री दातार

आज तिला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग मिळालेले असून तिचे फॅन्स तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करत आहेत. गायत्री तिच्या खऱ्या आयुष्यातील, तिच्या फॅमिलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

गायत्री दातारगायत्री दातार

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi