सोशल मीडियावर सध्या बॉटल कॅप चॅलेन्जची क्रेझ पाहायला मिळतेय. पायाने पहिल्याच प्रयत्नात बाटलीचं झाकण उडवायचं असं काहीसं हे चॅलेन्ज आहे. ऐकायला जरी हे सोपं वाटत असलं तरी करायला मात्र ते तितकंच अवघड आहे. बॉलिवूडच्या अनेक मंडळींनी हे चॅलेन्ज स्वीकारलंय. ‘स्टार प्रवाह’वरील ‘जिवलगा’ मालिकेतील कलाकारांनीही हे चॅलेन्ज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sorry @swwapnil_joshi #bottlecapchallenge #viral #trending

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

‘जिवलगा’ मालिकेतील काव्या म्हणजेच अमृता खानविलकरने हे चॅलेन्ज एका फटक्यात पूर्ण केलं तर तिकडे निखिल आणि विश्वास म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर आणि स्वप्निल जोशीने अनोख्या ढंगात हे चॅलेन्ज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ‘जिवलगा’ मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर हे व्हिडिओज पोस्ट केले असून नेटिझन्सनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

dd

‘जिवलगा’ मालिकेच्या सेटवर स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर आणि सिद्धार्थ चांदेकरने हे अनोखं चॅलेन्ज स्वीकारलं आणि पूर्णही केलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Why should boys have all the fun ? #bottlecapchallenge #kavya #way #mypaluisstrongerthanyourkick #sorryjasondada

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

जिवलगा मालिकेतही या कलाकारांसमोर वेगवेगळी आव्हानं आहेत. लवकरच मालिकेत एक धक्कादायक वळणही येणार आहे. मालिकेतलं हे आव्हान पूर्ण करण्यात हे कलाकार कसे यशस्वी होतात हे पहाण्यासाठी न चुकता पाहा ‘जिवलगा’ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi