ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या अमृता खानविलकरचे सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतोय. त्याला कारणीभूत आहे तिचे इन्स्टाग्रामवरचे फोटो.

अमृता खानविलकर

अमृताचा हा अंदाज तिच्या फॅन्सना भावला आहे. तिच्या या फोटोंवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो असतो.

सोशल मीडियावर अमृता नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

अमृता खानविलकर

आपल्या अभिनय कौशल्याने मराठी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच 'राझी' व 'सत्यमेव जयते' या हिंदी चित्रपटातूनही तिने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. सध्या ती स्वप्निल जोशीसोबत 'जिवलगा' मालिकेत दिसतेय. या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच अमृताने टीव्ही पदार्पण केले आहे.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi