बाळूमामाच्या नावानं चांगभलं  या मालिकेमध्ये बाळूमामांनी नेहेमीच भक्तांचा उध्दार केला आहे, त्यांच्या मदतीसाठी धावून गेले आहेत. आजवर बाळूमामांनी केलेले अनेक चमत्कार गावकर्‍यांनी अनुभवले, काहींची बाळूमामांवर श्रद्धा जडली तर अनेकांनी बाळूमामांना कमी लेखले... तरीदेखील कोणाच्याही बोलण्याला न जुमानता बाळूमामांनी भक्तांची मदत करणे नाही सोडले. अशाच एका भक्ताला योग्य मार्ग दाखवण्यासाठी बाळूमामा सज्ज झाले आहेत...बाळूमामांच्या ह्या भक्तासमोर नेमकं काय संकट उभं ठाकलयं ? या संकंटातून बाळूमामा भक्ताला कसे वाट दाखवतील? कसे ते भक्ताला त्याची खरी ओळख मिळवून देतील ? या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. तेंव्हा नक्की बघा बाळूमामाच्या नावानं चांगभलं सोम ते शनि रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

balumama

गावामधील एका कुटुंबासमोर एक समस्या ओढवली आहे आणि ते म्हणजे गावातील पाटलाचे कुटुंब आहे... गावामधील पाटील श्रीमंत आहे त्याच्याकडे सगळे सुख आहे, संपूर्ण गाव त्याच्या म्हणण्यात आहे... पण त्याच्या मुलामध्ये काही दोष आहेत असे त्याला वाटते आहे... त्याच्या मुलाची लक्षण वेगळी आहेत, त्याला बायकांप्रमाणे शृंगार करायला आवडते आणि त्यामुळेच तो आणि त्याची पत्नी चिंतेत आहेत... दुसरीकडे पाटलाची बायको महादेवाची भक्त आहे... आपल्या मुलाचे सगळे नीट व्हावे, लग्न करण्यास तो तयार व्हावा यासाठी ती महादेवाला साकड घालते... पाटलाच्या मुलाचा लग्न करण्यास नकार आहे. त्याच्या नकाराच्या मागचे कारण गावाला माहिती नाहीये परंतु घरातील लोकांना माहिती आहे की, तो तृतीय पंथातील आहे.... बाळुमामा भक्ताची ही समस्या कशी दूर करतील ? तो लग्न करण्यास तयार होईल ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi