मुंबई :  बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांच्या दिवसाची सुरुवात धम्माकेदार गाण्याने होते. घरातील सगळे सदस्य गाण्यावर एकत्र येऊन डान्स करतात... बिग बॉसच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याला काही ना काही सवयी असतात... कोणी चहा बनवत, तर तुळशीला रोज नित्यनियमाने पाणी घालत, तर कोणाची जबाबदारी नसताना देखील घराला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत... अशीच एका सदस्याची सवय आता संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे आणि तो सदस्य म्हणजे किशोरी शहाणे... दररोज सकाळी किशोरी शहाणे अगदी त्याच उत्साहात सगळ्या सदस्यांसोबत मॉर्निंग डान्स करतात... आणि एक गोष्ट त्या न चुकता करतात आणि ती म्हणजे रोज त्या कॅमेराजवळ येऊन “शुभ सकाळ बिग बॉस” असे म्हणतात... यावरून मागील पर्वातील कोणत्या सदस्याची आठवण येते का हो तुम्हांला ? अगदी बरोबर मागील पर्वाची विजेती सदस्य मेघा धाडे देखील न चुकता बिग बॉसना “गुड मॉर्निंग बिग बॉस” असे म्हणायची आणि ते देखील बरच गाजलं होत...

किशोरी, रुपाली आणि वीणा यांचा KVR हा ग्रुप अगदी पहिल्या आठवड्यापासून चर्चेचा विषय बनला आहे... त्यांच्या मधली मैत्री, त्यांची मजा मस्ती, सगळ्यांनाच आवडत आहे... परंतु त्या तिघी करत असलेल्या चुका, त्यांच्या तयार झालेल्या ग्रुप मुळे त्यांचे घरातील  इतर सदस्यांशी असलेले वागणे, अशा काही गोष्टी महेश मांजरेकर यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या... ग्रुप करणे चुकीचे नाहीये, परंतु घरातील इतर सदस्यांशीदेखील बोला, मजा करा असे त्यांचे म्हणणे पडले... आता बघूया याची त्या कितपत अमलबजावणी करतात.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi