मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या सदस्यांची धम्माल सुरू आहे... काल घरामध्ये प्रसाद ओकने एंट्री घेतली. संजय नार्वेकर यांनी सदस्यांना दिलेल्या मजेदार टास्कमुळे घरामधील वातावरण थोड हलक फुलक झालं... आजदेखील घरामध्ये साप्ताहिक रंगणार आहे... ज्यामध्ये आता गुप्तहेर झालेल्या टीमला हीरे लपवायचे आहेत... बघूया आता ही टीम कोणकोणत्या नवीन जागा शोधून काढणार ? या टास्कमध्ये कोणती टीम विजयी ठरेल ?

safswf

आज अभिजीत केळकरने लपण्यासाठी एक वेगळीच जागा शोधून काढली आहे... ते पण बेडरूममधील पलंगाखाली जाऊन अभिजीत बसला आहे...आणि त्याला बाहेर कसे काढायचे हा प्रश्न गुप्तहेर झालेल्या टीमला पडला आहे... किशोरी ताईनी देखील विचारले आता अभिजीतला बाहेर कसे काढायचे...त्यावर पुष्कर श्रोत्रीने पलंग उचला...आणि नेहा लागलीच पलंगाखाली गेली अभिजीतला बाहेर काढायला. का लपला असेल अभिजीत तिथे ? टास्कमध्ये जिंकण्यासाठी सदस्य खूप मेहेनत घेत आहेत ... बघूया इतक्या प्रयत्नानंतर कोणती टीम विजयी ठरेल ? तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi