मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नेहेमीच चर्चेत असलेली दोन नावे म्हणजे वीणा आणि शिव... घरामध्ये या दोघांचे एकमेकांशिवाय पान हलत नाही. जिथे वीणा तिथे शिव असे सहसा आपल्याला दिसते... महेश मांजरेकरांनी देखील WEEKEND चा डाव मध्ये वीणा याचा कंटाळा येत नाही का ? आता खेळाकडे लक्ष द्या असे शिवला सांगण्याचा सल्ला दिला... यानंतर या आठवड्यामध्ये दोघांमध्ये काही बदल दिसेल की नाही हा मोठा प्रश्न आहे... पण आज वीणा आणि शिवमध्ये वाद होणार आहे... शिवच्या बोलण्याने वीणा खूप दुखावली आहे आणि तिने तिच्या भावना किशोरीताई जवळ व्यक्त केल्या...

svcsv

खरतर दर आठवड्याला या घरामधील समीकरण बदलतात... नाती बदलतात... पण नाती कशी टिकवून ठेवायची हे प्रत्येक सदस्यावर असते... वीणाला शांत आहे हे बघून शिवने विचारले काय झाले ? पण त्यावर वीणाचे म्हणणे होते काहीच नाही... शिव म्हणाला मला सांग काय प्रॉब्लेम आहे ? वीणा त्यावर त्याला म्हणाली आवाज हळू कर माझं खूप डोक दुखत आहे... वीणाच्या अश्या बोलण्याचा शिवला राग आला आणि त्याने रागात वीणाला उत्तर दिले “इतक घाणेरड अॅटीट्यूड आहे, का मी सेफ झालो त्याचा प्रॉब्लेम आहे ? माहिती नाही”... वीणाला शिवच्या या वाक्याचे वाईट वाटले. आज वीणा झालेला प्रकार किशोरीताईन सांगणार आहे ... किशोरी ताईंचे देखील म्हणणे पडले अस का म्हणाला शिव ? त्यानंतर वीणाने सांगितले महेश सर देखील म्हणाले तू नेहेमी विरुध्द टीमला पाठिंबा देते... मी शिवला पाठिंबा देत होते कारण शिव मागील आठवड्यापासून तो खूप अस्वस्थ होता. मी प्रत्येक टास्क प्रामाणिकपणे खेळते असे आरोप मी नाही सहन करू शकत, माझ्या मनाला काही गोष्टी खूप लागल्या आहेत. अस असेल तर मी घरी जायला पण तयार आहे पण मी असे आरोप नाही सहन करणार”

vvzxv

शिव वीणा मधील वाद मिटेल ? बघूया पुढे काय होईल ? नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi