मुंबई : बिग बॉस मराठीमध्ये घरातील सदस्यांना एक मस्त सरप्राईझ मिळणार आहे... आज जुन्या आठवणी, किस्से, मैत्री आणि टास्क हे पुन्हाएकदा परत प्रेक्षकांना आठवणार आहेत... कारण आज घरामध्ये पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे तसेच रेशम टिपणीस आणि सुशांत शेलार जाणार आहेत. आता खेळाच्या या टप्प्यावर पोहचल्यानंतर हे जुने गडी नव्या सदस्यांना कोणते सल्ले देतील ? कसे प्रोत्साहन देतील ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे... काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये म्हातारीचा बूट हे कॅप्टनसी कार्य सुरू होते परंतू शिवच्या चुकीमुळे हे कार्य स्थगित करण्यात आले. बिग बॉस यांनी शिवला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट केले आणि घराचा कॅप्टन होण्याच्या शर्यती मधून बाद केले आणि त्यामुळेच किशोरी शहाणे यांनी घराचा कॅप्टन होण्याचा मान पटकवला.

DD

घरामध्ये आज  काय  काय घडणार ? कोणता टास्क बिग बॉस सदस्यांवर सोपवणार ? हे बघणे रंजक असणार आहे... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

aA

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi