मागील पर्वातील स्‍पर्धकांच्‍या उपस्थितीसह घरातील उत्‍साह वाढला आहे. घरामध्‍ये स्‍पर्धकांवर सतत नजर ठेवली जात आहे. याचा अर्थ असा की, त्‍यांना २४/७ दक्ष राहण्‍याची गरज आहे. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये आधीच्‍या पर्वातील विजेती मेघा धाडे तिची मुलगी साक्षीबाबत आठवणी शेअर करताना दिसत आहे.

''मी आता इथे येण्‍यासाठी पॅकिंग करताना साक्षी बोलली हेअर स्‍ट्रेटनर घेऊन जा, तर मी बोलले कशाला शिवानीचा वापरेन ना, साक्षी म्‍हणते मग तू बॅगच कशाला नेतेस शिवानीचंच वापर सगळं. तिनेच बॅग पॅक केली आहे माझी! माझं काहीही काम असलं ना की माझ्यापेक्षा जास्‍त तिचा उत्‍साह असतो,'' मेघा आनंदाने असे सांगते आणि घरातील इतर मंडळी आवडतीने ऐकत असतात.  

मेघा पुढे सांगते की, तिची १५ वर्षांची मुलगीच पूर्वीच्‍या पर्वासाठी तिची स्‍टायलिस्‍ट होती. ती म्‍हणते, ''ती मला तिच्‍या परमिशन शिवाय काहीच घालू देत नाही. मी जेव्‍हा लास्‍ट सीझन इथे आली, ती तेव्‍हा १०वीमध्‍ये होती आणि बिग बॉस मराठीचे माझे सगळे कपडे, स्‍टाइल साक्षीने केलेत!'' शिवानी तिला थांबवते आणि म्‍हणते, ''ती माझ्यावर पण चिडली होती की शिवानी दीदी यु शुड हॅव वॉर्न वेस्‍टर्न क्‍लोथ्‍स, व्‍हाय यु आर वेअरिंग इंडियन. यु शुड हॅव कॉल्‍ड मी, मी आले असते शॉपिंग करायला तुमच्‍याबरोबर.''  

मेघा अभिमानी आईप्रमाणे आपल्‍या मुलीचे कौतुक करत म्‍हणते, ''माझा मराठी सीझनचा प्रत्‍येक ड्रेस, त्‍याच्‍या सोबतच्‍या अॅक्‍सेसरीज काय आहेत, ते सगळं तिने एक-एक पॅकिंग केलेलं, कारण मला तीनच दिवस मिळाले होते म्‍हणजे सीझनच्‍या ३ दिवस आधी माझं फायनल झालं. मी सगळ्यात शेवटची कन्‍टेस्‍टण्‍ट होते फायनल झालेली. सो, ३ दिवसात तिने रात्रंदिवस एक करून माझं पॅकिंग केलं!''

किशोरी अचंबित होते. मेघा पुढे म्‍हणते, ''मी तिची आई आहे की ती माझी आई आहे हे मला कधी कधी कळत नाही, हिला विचार ती माझ्यावर किती लक्ष ठेवत असते. केस असे ठेव, हे हेअर नाही छान वाटत आहेत. मला आता पण माहित नाही की तिने बॅगमध्‍ये काय ठेवलं आहे, मी तिच्‍या परमिशन शिवाय काही नाही घालू शकत!''

आम्‍ही फक्‍त एवढेच म्‍हणू शकतो की मेघा प्रतिभावान मुलगी मिळाल्‍याने भाग्‍यवान आहे, जिला पोशाखाच्‍या सर्व बारीकसारीक गोष्‍टी माहित आहेत. अशा अचंबित करणा-या गोष्‍टी जाणण्‍यासाठी पाहत राहा वूटवरील 'अनसीन अनदेखा'!

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi