बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन येत्या २६ मे रोजी सुरू होत आहे. या घरात कोण स्पर्धक असणार याची उत्सुकता प्रत्येकाला असताना शर्मिष्ठा राऊत ने  'बिग बॉस' जिंकायचं असेल तर स्पर्धकांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला हवं?  या प्रश्नाचं उत्तर शर्मीष्ठाने टेल्लीचक्कर मराठी'ला  दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिलंय. ती म्हणाले की, "बिग बॉस'च्या घरात राहण्यासाठी  स्पर्धक कितीही तैयारी करून गेला असेल, तरीही ते सगळे प्रयत्न फेल ठरतात. 'बिग बॉसच घर असा आहे कि जणू ते तुम्हाला सगळं काही विसरायला लावत" त्याच सह तिने सगळ्या स्पर्धकांना हा मेसेजही दिला कि "तुम्ही तिथे खोटं बोलू किंवा नाटक करूच नाही शकत. जसे रिअल आहेत तसेच राहा. अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणासारखं तरी वागाल, त्यांचं अनुकरण कराल आणि जिंकाल असं वाटत असेल तर तसं होत नाही.

तसेच या घरात नेमके कोण कोण कलाकार असतील हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत. परंतु, अभिनेता मिलिंद शिंदे, अभिनेत्री रसिका सुनील,अभिनेत्री नेहा पेंडसे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेत्री मनवा नाईक, अभिनेत्री केतकी चितळे, अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, नाट्यकर्मी दिगंबर नाईक, टिकटॉक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अमृता देशमुख अशा काही नावांची जोरदार चर्चा रंगली आहे.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi