मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल “हाफ तिकीट हे नॉमिनेशन कार्य रंगले... बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवासाच्या उत्तरार्धाची सुरुवात आता झाली आहे... आणि आता यापुढे प्रवास अजूनच खडतर होत जाणार आहे, त्यामुळे सदस्यानी त्यांची घरात रहाण्याची पात्रता सिद्ध करणे तितकेच जिकरीचे बनले आहे. या घराचा कॅप्टन असल्याने अभिजीत केळकर या नॉमिनेशन कार्यापासून सेफ आहे... तर नेहा आणि वीणा या टास्कमध्ये जाणारी पहिली जोडी ठरली आणि दोघींनी सुध्दा एकमेकींना तिकीट देण्यास साफ नकार दिला. तर दुसरी जोडी हिना आणि शिवची होती... हिनाने शिव आणि तिच्यामध्ये झालेले सगळे वाद विसरून त्याला तिच्याकडचे तिकीट देऊन सेफ केले... तर किशोरी आणि वैशालीमध्ये वाद रंगला... तुमचा मुद्दाच मला पटत नाही असे वैशालीने किशोरीताईना सांगितले. आणि दोघीसुध्दा नॉमिनेशन मध्ये गेल्या... त्यानंतर माधव आणि रुपाली मध्ये देखील कोणीच कुणाला तिकीट न दिल्याने दोघीही नॉमिनेशन मध्ये गेले...

त्यामुळे वीणा जगताप, रुपाली भोसले, किशोरी शहाणे, माधव देवचके, हिना पांचाळ, नेहा शितोळे आणि वैशाली म्हाडे या आठवड्यामध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले... तर अभिजीत केळकर आणि शिव ठाकरे सेफ झाले... आता प्रेक्षकांची मते कोणाला वाचवणार ? कोण घराबाहेर जाणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi