बालपण हा प्रत्‍येकाच्‍या जीवनातील सर्वात संस्‍मरणीय काळ असतो. संस्‍मरणीय आठवणी नेहमीच व्‍यतित केलेल्‍या जुन्‍या काळामध्‍ये घेऊन जातात. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये किशोरी व नेहा दिवाळीतील त्‍यांच्‍या बालपणाच्‍या प्रेमळ आठवणी सांगत आहेत.

किशोरी दिवाळीसाठी तिच्‍या कुटुंबातील परंपरेची आठवण करून देत म्‍हणते, ''आपल्‍याकडे जे पहाटे फटाके उडवायची पद्धत आहे ना, तर डॅडी माझे एकमेव पुरूष, आम्‍ही तिघी बहिणी ना तर नरक चतुर्थीला त्‍यांची आंघोळ तर आम्‍ही मालिश करायचो डॅडीला. तेव्‍हा ते आम्‍हाला सतवायला कमी मालिश झाली अजून करा बरोबर असे सतवायचे.''

नेहा देखील आपल्‍या आठवणी सांगत म्‍हणते, ''मला फुलबाजा खूप आवडतात खूपच जास्‍त!'' किशोरी पुढे म्‍हणते, ''ते पहाटे फटाके उडवणं वगैरे ती सगळी मज्‍जा होती लहानपणी, रांगोळी काढणं.''

किशोरी तिच्‍या मावशीच्‍या घरातील आठवणींना उजाळा देत म्‍हणते, ''मावशीकडे जायचे मी कधी दिवाळीत राहायला, कर्जतला राहायची ती. तिचा बंगलो होता, पुढे अंगण होतं, तर अंगणात शेण सारावणं, त्‍यावर डॉटवाली रांगोळी काढणं आणि मी रांगोळी एक्‍स्‍पर्ट. इथे मुंबईत पण मी रोज रांगोळी काढते, वासुबरसपासून सुरू होतं. प्रत्‍येक दिवसाचं जे महत्‍त्‍व ती रांगोळी काढते.''

या गोड आठवणींबाबत अधिक माहिती जाणून घ्‍या फक्‍त वूटवरील 'अनसीन अनदेखा'मध्‍ये!

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi