मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नियमांचे उल्लंघन करण्यास सक्त मनाई आहे आणि तसे जर कोणत्या सदस्याने केले तर तो सदस्य शिक्षेस पात्र असतो... अभिजीत बिचुकले बर्‍याचदा या घराच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. आज अभिजीत बिचुकले पुन्हाएकदा नियम मोडताना दिसणार आहेत... बिग बॉसच्या घरामध्ये दिवसा झोपण्यास सक्त मनाई आहे आणि तसे केल्यास कोंबडा आरवतो हे माहिती असताना देखील बिचुकलेंनी तो नियम पुन्हा मोडला...

cc

शिवानीचे म्हणणे पडले आता त्यांना आतमध्ये म्हणजेच अडगळीच्या खोलीमध्ये टाक. तर नेहा म्हणाली मी त्यांना कालच सांगितले आहे आता मी पाण्यात उभे करणार आहे. नेहा आज अभिजीत बिचुकले यांना स्वीमिंग पूलमध्ये उभे रहाण्याची शिक्षा देणार आहे... अभिजीत बिचुकलेंचे त्यातही म्हणणे आहे पूर्ण उभा नाही राहू शकत तर नेहा देखील पाण्यात उतरली... नेहाचे म्हणणे पडले तुमची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे पूर्ण पाण्यात उभे रहा, नेहाने सदस्यांना त्यांच्याशी बोलण्यास मनाई केली. शिक्षेमध्ये देखील बिचुकले काही ना काही मजेचा मुद्दा शोधतात आणि घरातल्यांचे मनोरंजन करतात.

adad

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi