मुंबई: बिग बॉस मराठीच्या घरामधील सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या KVR ग्रुपमधील भांडण संपता संपेना... एक मुद्दा झाला कि दुसरा मुद्दा तो संपत नाही तर तिसरा मुद्दा डोक वर काढतो... त्यामुळे घरातील इतर सदस्य आणि प्रेक्षकांना वीणा, रुपाली आणि किशोरीताई या तिघींच्या मनामध्ये नक्की काय आहे हेच कळत नाहीये... काय गैरसमज आहेत ?  कोणत्या कारणावरून त्या एकमेकींवर नाराज आहेत ? याबद्दल प्रश्नचिन्हच आहे... कधी वीणाचं रुपालीसोबत भांडण होत तर कधी किशोरीताई सोबत... कधी रुपाली वीणावर नाराज होते तर कधी किशोरीताई वर... कधी किशोरीताई वीणा आणि रुपालीमधील गैरसमज दूर करतात तर कधी रुपाली किशोरी आणि वीणामधील... आणि  यामध्येच आठवडे संपत आहेत... कधी ग्रुप आहे आणि ग्रुप बनून खेळणार असे म्हणतात तर कधी वैयक्तिक खेळत आहेत असे म्हणतात... यामध्ये किशोरीताईचा मुद्दा असा आहे कि, मी आता माझ्याबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे... दुसऱ्या सदस्यांशी बोलत आहे... कालच माधवशी चर्चा करताना त्या म्हणाल्या मला खूप फ्री झाल्यासारखे वाटते आहे...

आज देखील या तिघींमध्ये होणाऱ्या चर्चेचा विषय तोच आहे... रूपालीचे म्हणणे आहे, आज जे मी गाण म्हंटल ते म्हणूनच होत कि, अजूनही मला कुठेतरी वाटत आहे कि आपण तिघी एकत्र आहोत, तू ऐकल नाहीस का ते...त्यावर किशोरीताईचे म्हणणे होते मला डबल डबल वागायला जमत नाही, मी एकमार्गीच वागते. कधी एक बोलायचं कधी दुसर बोलायच यामध्ये मला नाही अडकायचे आहे. त्यावर वीणा म्हणाली असे कोणीच करत नाही. रुपाली बोलताना म्हणाली, पंचिंग bag वाला जो टास्क होता त्यावर तुझा फोटो लावण्याचे कारण होते मला तुझ्याशी बोलताच येत नाही, तुला सांगता येत नाही काही, तुला समजवता येत नाही. त्यावर किशोरीताई म्हणाल्या, मी नेहेमीच गप्प असते तुम्ही दोघीच बोलत असता... रुपाली म्हणाली हे तू सगळ्यांनाच सांगितले आहे... त्यावर त्या म्हणाल्या मला सांगायची गरज नाही... त्यावर रुपाली म्हणाली हे तू हिनाला सांगितलं माझ्यासमोर आणि वीणा म्हणाली, किशोरीताई अस देखील म्हणाली, कर्म आहे, सगळ्यांचे कर्म इथेच फिटतील, इथून जाण्याच्या आधी सगळे भोगून जातील”. त्यावर किशोरीताई म्हणाल्या “शिवला तू म्हणालीस स्वत:च्या डोक्याने नाही खेळत, तुम्ही दोघी माझ्यामागे बोलता... त्यावर दोघींचे म्हणणे होते मागे नाही समोर बोलो आम्ही... आणि आरोप प्रत्यारोप सुरूच राहिले... मला यावर नाही बोलायचे असे बोलून किशोरीताई तिथून उठून गेल्या ...

आता पुढे या दोघींचे काय म्हणणे आहे ? हे सगळ कसं आणि कधी मिटेल ? हा प्रश्नच आहे ... तेंव्हा पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi