बिग बॉस घरातील आपली लाडकी लावणी सम्राज्ञी बाहेर पडल्‍याने अनेक स्‍पर्धकांना धक्‍का बसला आहे आणि सर्व स्‍पर्धकांना त्‍यांची खूप आठवण येत आहे. यापैकीच एक आहे अभिजीत केळकर, जो त्‍यांच्‍या एलिमिनेशची बातमी ऐकताच खूपच दु:खी झाला. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'मधील नवीन क्लिपमध्‍ये आम्‍ही भावूक अभिजीत सुरेखा ताईंबाबत बोलताना आणि स्‍वत:च्‍या जीवनातील अनुभव सांगताना दाखवत आहोत.

abhijeet

अभिजीत म्‍हणतो, ''सुरेखा ताई बाहेर गेल्‍यामुळे मी थोडा सायकोलॉजीकली डाऊन झालो, डिस्‍टर्ब झालो. मोठा माणूस असला की एक आधार असतो ना, की काही झालं घरात तर आहेत ते!'' रूपाली देखील यावर होकार देत म्‍हणते की, बाप्‍पा व सुरेखा ताईंच्‍या बाहेर जाण्‍याने बीबी घरामध्‍ये अनेक बदल झाले आहेत.

पुढे सादर होते ते उदासीन अभिजीतकडून एक हृदयस्‍पर्शी प्रकटीकरण, जो सुरेखा ताईची त्‍याच्‍या बालपणीच्‍या केअरटेकरसोबत तुलना करतो आणि म्‍हणतो, ''मी ज्‍यांच्‍याकडे लहानाचा मोठा झालो ना त्‍या एक्‍झॅक्‍ट सुरेखा ताई सारख्‍याच आहेत. मी फार बोललो नाही कधी त्‍यांच्‍याशी पण अटॅचमेंट होती मला. आई बाबा जॉबला जायचे, त्‍यांच्‍याकडेच असायचो आम्‍ही. त्‍यांनी खूप केलं आहे माझ्यासाठी, कोणाचा मुलगा आहे हे चाळीतल्‍या लोकांना कळायचं नाही. हौस, मौज माझी, काय हवं असेल ते आणून दिलं त्‍यांनी.''

तो पुढे म्‍हणतो, ''ह्या सगळ्या गोष्‍टी त्‍यांच्‍याशी बोललो नाही पण होतो त्‍यांच्‍याशी अटॅच्‍ड!''

आम्‍हाला खात्री आहे की, सुरेखा ताई हे ऐकत असतील आणि बिग बॉस घराबाहेर देखील दोघांमध्‍ये समान नाते पहायला मिळेल. पाहत राहा 'अनसीन अनदेखा' सेगमेंट, फक्‍त वूटवर. 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi