स्टार प्रवाह’वरील ‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर नुकताच विनोदाचा बादशहा जॉनी लीवर यांचा वाढदिवस अनोख्या ढंगात साजरा करण्यात आला. जॉनी भाईंचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे जिद्द स्पेशल शाळेतल्या स्पेशल मुलांनी ‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर हजेरी लावली होती. या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सेटवर प्रत्येक जण भावूक झाले होते. लहानग्यांसोबत लहान होत जॉनी भाईंनी या मुलांचं कौतुक केलं आणि त्यांच्यासोबत डान्सही केला. या खास प्रसंगी जॉनी लीवर यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.

dcsfc

या अनोख्या सरप्राईजविषयी सांगताना जॉनी लीवर म्हणाले, ‘हा वाढदिवस माझ्या कायम स्मरणात राहिल. लहानपणी आमची परिस्थिती अत्यंत हालाकिची होती. वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसेच नसायचे. त्यामुळे माझा वाढदिवसही कोणाच्या लक्षात नसे. एक दिवस मी पैसे साठवून बिस्कीटचा एक पुडा आणून सर्वांना वाटला होता आणि माझा वाढदिवस साजरा केला होता. दिवस तसेच रहात नाहीत. पण त्यातही सुख दडलेलं होतं. आज जिद्द शाळेच्या मुलांसोबत वाढदिवस साजरा होतोय याचा आनंद आहे शिवाय माझं कुटुंबही आज हजर होतं यापेक्षा मोठा आनंद तो काय.’

जॉनी लीवर यांच्या वाढदिवसाचं हे अनोखं सेलिब्रेशन १६ ऑगस्टच्या विशेष भागात पाहायला मिळणार आहे. शिवाय ‘एक टप्पा आऊट’चे हे एपिसोड्स सेमी फिनाले एपिसोड्स आहेत. त्यामुळे स्पर्धकांचे उत्तमोत्तम परफॉर्मन्सेस पाहायला मिळतीलच आणि महाअंतिम सोहळ्यासाठी कोणत्या स्पर्धकांची निवड होतेय हे पहाणंही उत्सुकतेचं असेल. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘एक टप्पा आऊट’ शुक्रवार ते रविवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi