तुम्हाला ऐकण्यात गुंतवून ठेवणारी ऑन-लूप प्ले लिस्ट कशी तयार होते? वेगवेगळ्या बॉलिवूड गाण्यांच्या परफेक्टमिक्सने नक्कीच मूडला उभारी मिळते आणि एमटीव्ही बीट्स हे असं ठिकाण आहे- जिथेमिळतील संपूर्ण कुटुंबाला हवं असणारं मनोरंजन!चॅनेल एक नवाकोरा शो घेऊन येण्यासाठी सज्ज आहे, एमटीव्ही बीट्स टॉप २० काउंटडाऊन, ज्यामध्ये असतीलकाही हॉट-शॉटसोबत बॉलिवूडमधील लेटेस्ट गाणीआणि या चमकदार शहरातील रसभऱ्या गॉसिप्स. उत्साही, देखणी गायिका अक्षा सिंग या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी तयार आहे. त्याचबरोबर ती या आठवड्याच्या काउंटडाऊनसोबत तुम्हाला सांगणार आहे ट्रेंडिंग आणि सेन्सेशनल स्टोरीज.

वेड लावणारं संगीत, बॉलिवूड ट्रिव्हिया आणि हास्याचे फवारे देणारे चॅनेल तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक परिपूर्ण मनोरंजनाचे पॅकेज आणि टॉप २० काउंटडाऊन हा या मोसमातील सर्वोत्तम कार्यक्रम ठरेल.९ जूनपासून सुरू होणारा हा कार्यक्रम दर रविवारी सकाळी ८ आणि ११ वाजता तसेच संध्याकाळी ८ वाजता प्रसारित होईल. एमटीव्ही बीट्स टॉप २० काउंटडाऊनमुळे या उन्हाळ्याला पार्टीचे स्वरूप येईल आणि अक्षाच्या चुणचुणीतपणामुळे सगळ्यांनाच आनंद मिळेल. या शोबद्दल अक्षा म्हणाली,''प्रेक्षकांसाठी एमटीव्हीवर २० गाण्यांच्या काउंटडाऊनचा एमटीव्ही बीट्स हा कार्यक्रम सादर करण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. सुंदर गाणी आणि बी टाऊनमधील इतर ठिकाणी न ऐकलेले गॉसिप्स यांचा सुरेख संगम असल्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे नक्कीच एक उत्साहपूर्ण सफर ठरणार आहे. यामुळे मला पुन्हा एकदा सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत यायला मिळतं आहे आणि संगीत व बॉलिवूडसंबंधीचं माझं प्रेम मला साजरं करायची संधी असं सगळं एका ठिकाणी मिळते आहे.आणखी एका आनंददायी कार्यक्रमाची वाट पाहतेय.''

अक्षासोबत संगीताची जादू अनुभवण्यासाठी आणि काय हॉट आहे, काय ट्रेंडिंग आहे याचे अपडेट्स जाणून घेण्यासाठीतयार रहा, कारण काउंटडाऊनला सुरुवात होत आहे. तुम्ही मिस करू इच्छिणार नाही अशा शोसाठी तयार रहा. ट्यून करा टॉप २० काउंटडाऊन, दर रविवारी केवळ एमटीव्ही बीट्सवर.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi