सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील द कपिल शर्मा शोमध्ये, या सप्ताहाअंती बॉलीवुडमधील आकर्षक आणि अष्टपैलू अभिनेता शाहिद कपूर आणि सुंदर कियारा अडवानी त्यांच्या कबीर सिंह या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी उपस्थित असतील त्यामुळे हा भाग उत्साहाने सळसळता असेल. कपिल शर्माच्या बुद्धिमत्तेने आणि विनोदाने या दोघांची हसून पुरेवाट झाली. ते सुद्धा त्यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेले मनोरंजक किस्से सांगतील. 

इतर अभिनेत्यांप्रमाणे शाहिद कपूरसाठीही साकारत असलेल्या या भूमिकेत शिरण्याची व त्यातून बाहेर पडण्याची प्रक्रिया त्रासदायक होती. कपिलबरोबर या चित्रपटाविषयी बोलताना, शाहिद कपूरने त्याच्या भूमिकेचा नकारात्मक टप्पा सोडण्यासाठी एक अतिशय मनोरंजक पद्धत अवलंबल्याचे स्पष्ट केले, जेणेकरून तो आपली बायको आणि मुलांसह आनंदात राहू शकेल. त्याने अनेक चित्रपटांत साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकांविषयी बोलताना कपिल शर्माने, शूटिंग नंतर सामान्य होण्यासाठी तो खरोखरच आख्खे 2 तास स्नान करतो का हे त्याला प्रेक्षकांसमोर स्पष्ट करण्यास सांगितले. याचे स्पष्टीकरण देताना शाहिद कपूर म्हणाला,“हो, कारण मी अनेक गंभीर, उत्कट चित्रपटांतून काम केले आहे आणि कबीर सिंह हासुद्धा असाच चित्रपट आहे, ज्यासाठी मी खूप तयारी केली आहे. चित्रपटातील माझी भूमिका सतत रागावलेल्या माणसाची असल्याने मी नंतर 2 तास स्नान करून माझे चित्त थार्‍यावर आणत असे जेणेकरून मी सामान्य होईन कारण माझी पत्नी आणि मुलांवर भूमिकेतील नकारात्मकतेचा परिणाम व्हावा असे मला वाटत नाही.” 

Shadhis

सेटवरील सूत्रांनी सांगितले,“शाहिद कपूर आणि कियारा अडवानी यांनी शो च्या सेटवर येऊन त्यांच्या कारकीर्दीबाबत तसेच वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक अंतर्गत बाबी सांगितल्या, त्यामुळे खूप मजा आली. कपिलबरोबर बोलताना चाहत्यांना कमी माहीत असलेल्या काही गोष्टी शाहिदने स्पष्ट केल्यामुळे त्याचे चाहते खूश होतील. शाहिद भूमिका निवडण्याच्या बाबतीत चोखंदळ म्हणून प्रसिद्ध आहे आणि भूमिकेतील बारकावे मोठ्या पडद्यावर सुंदररित्या मांडण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करतो. त्याचा परिवार त्याच्यासाठी अग्रक्रमावर आहे ही खूपच चांगली बाब आहे आणि शूट झाल्यावर घरी जाताना तो संपूर्णपणे भूमिकेतून बाहेर येईल याची खबरदारी घेतो जेणेकरून तो त्याची पत्नी मीरा राजपूत आणि मुलांकडे एक सामान्य आनंदी व्यक्ती म्हणून परतू शकतो.” 

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये शाहिद कपूरच्या साग्रसंगीत स्नानाबद्दल उलगडा झाला

शो मध्ये पुढे, शाहिद कपूरने हे सुद्धा सांगितले की वास्तविक जीवनात जेव्हा त्याला राग येतो तेव्हा राग शांत होण्यासाठी तो खोलीच्या एका कोपर्‍यात शांतपणे बसून राहतो, त्याच्या नकारात्मक मनःस्थितीचा प्रभाव दुसर्‍यावर पडू नये असे त्याला वाटते.  

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi