नाटक आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून श्रेया बुगडे रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. नुकताच श्रेयाने एक फोटो शेअर करुन आपल्या फॅन्सचे आभार मानले. श्रेयाच्या इन्स्टाग्रामवरील फोलॉवर्सची संख्येने सहा लाखांचा टप्पा पार केला आहे. याबाबत श्रेयाने सर्व फॅन्सचे आभार मानले आहेत.

श्रेया बुगडे

 ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील विनोदवीरांसोबतच  श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं.

श्रेया बुगडे

 

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi